महाराष्ट्र लातूर

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची वयाच्या 91 व्या वर्षी कोरोनावर मात!

लातूर | माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी वयाच्या 91 व्या वर्षी कोरोनावर मात केली आहे. त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना 16 जुलैला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना काही लक्षणं जाणवत होती. त्यावेळी त्यांनी तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर 17 दिवसांनी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक मंत्री, आमदार, खासदार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विद्यमान मंत्र्यांनी कोरोनावर मात केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

अशोक चव्हाण यांना 25 मे रोजी कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नांदेडवरुन मुंबईला हलवलं होतं. त्यानंतर उपचाराअंती अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या-

उस्मानाबादेत कोरोनाला रोखण्यासाठी मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्ती करणार खर्

“सुशांतच्या अकाऊंटमधून रियाने 90 दिवसांत इतके कोटी खर्च केले”

“5 ऑगस्टला राम मंदिराचं भूमीपूजन होईल आणि मोदींच्या नेतृत्वाखाली रामराज्य येईल”

कौतुकास्पद! ज्या इयत्तेत नापास झाला पुढे त्याच इयत्तेच्या पुस्तकात छापली आनंदची यशोगाथा

पालकमंत्री एकनाथ शिंदेंवर मनसेचे गंभीर आरोप, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या