छेडछाड प्रकरणातील दोषी पहिल्या रांगेत, भाजप सरकारचा प्रताप

पंचकुला | 1990च्या रुचिका गिहरोत्रा छेडछाड प्रकरणातील दोषीला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात खट्टर सरकारने चक्क पहिल्या रांगेत स्थान दिल्याचं समोर आलंय. काँग्रेसनं याप्रकरणी भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केलीय. 

एसपीएस राठोड असं या महाशयांचं नाव आहे, ते माजी पोलीस महासंचालक आहेत. त्यांच्या छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय टेनिसपटूनं आत्महत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत दीड वर्षांची शिक्षा सुनावली होती. 

दरम्यान, राठोड सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र हरियाणा सरकारनं त्यांना सन्मानित केल्यानं खळबळ उडालीय.