मुंबई | अमित देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस नेते आणि माजी केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांची सुन मैदानात उतरवण्याची तयारी भाजपने सुरू केली होती. मात्र भाजपचा हा डाव फसला आहे. मी किंवा माझे कुटुंबिय मरेपर्यंत काँग्रेस सोडणार नाही, असं चाकुरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
लातूरमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही चिरंजीवांच्या विरोधात भाजप मोठ्या शक्तीने आणि युक्तीने लढण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच त्यांचा डोळा आता अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्यावर आहे. शिवराज पाटील चाकुरकर यांची सुन मैदानात उतरवण्याची भाजपची चाल होती.
त्याचाच भाग म्हणून गेले अनेक दिवस भाजप चाकुरकर यांच्या संपर्कात होतं. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. काँग्रेसची विचारधारा हाच आपला श्वास आहे. त्यामुळे मी किंवा माझे कुटुंबिय कधीच पक्ष सोडणार नाही, असं चाकुरकर म्हणाले आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपासून भाजपने काँग्रेसची वारंवार कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचाच भाग म्हणून लातूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारासमोर काँग्रेस पक्षातलाच कोणीतरी फोडायचा आणि त्याला भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवायला लावायची, अशी रणनिती भाजपने आखली होती. मात्र सध्या तरी ती रणनिती फेल ठरल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या-
तुम्ही ‘शहा’ असाल पण बाबासाहेबांनी दिलेलं संविधान ‘बादशाह’ आहे! https://t.co/DERMimldlP @asadowaisi @AmitShah #विधानसभा
— थोडक्यात (@thodkyaat) October 3, 2019
रामदास आठवलेंची रिपाइं विधानसभा निवडणूक ‘या’ चिन्हावर लढणार!- https://t.co/E9AgWGPn4B @RamdasAthawale
— थोडक्यात (@thodkyaat) October 3, 2019
मी जर मेलो तर औरंगाबादच्या जमिनीवर मला मरण यावं- असदुद्दीन ओवैसी https://t.co/UghuY90Ruv @asadowaisi
— थोडक्यात (@thodkyaat) October 3, 2019
Comments are closed.