Top News आरोग्य कोरोना पुणे

खेडचे माजी आमदार सुरेश नामदेवराव गोरे यांचं कोरोनामुळे निधन

पुणे | पुण्याजवळच्या खेडचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश नामदेवराव गोरे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर पुण्यातील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 25 दिवसांपासून हे उपचार सुरु होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गोरे यांना 2009 मध्ये देण्यात आलेली खेडची उमेदवारी काही कारणास्तव रद्द केली होती, त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन ते आमदार झाले होते.

महत्वाच्या बातम्या-

कंगणा राणावत पुन्हा अडचणीत, ‘या’ कारणामुळे कोर्टानं दिला गुन्हा दाखल करण्याचा आदेश

“केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे शेतकरी आणि कामगारांवर अन्याय करणारे”

“राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो”

धक्कादायक! भर बाजारात अशी केली आत्महत्या, ऐकणाऱ्याच्या अंगावर येईल काटा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या