बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सारखं Instagram Reels पाहणं आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक, महत्त्वाची माहिती समोर

मुंबई । अलीकडे सोशल मीडियामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती मिळवणं सोपं झालं आहे. त्यातच वाढत्या Social Media प्लॅटफॉर्म्सने नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे. आपण नेहमीच पाहत असतो की या Technology चा जेवढा उपयोग होतो तेवढाच तोटाही अनेकांना सहन करावा लागतो. आज आम्ही याबद्दलच तुम्हाला माहिती देणार आहोत.

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच हातात सर्रासपणे दिसणारी वस्तू म्हणजे मोबाईल. आता त्यात इन्स्टाग्राम आणि त्यावरील रिल्समुळे मोबाईलचा वापर अतिप्रमाणात होताना दिसतोय. मात्र मोबाईलचा याच अतिवापर आरोग्याला धोका निर्माण करून मेंदूचे आजारांना निमंत्रण देणारा ठरू शकतो.

तरूणांमध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे Brain Fogg म्हणजेच मानसिक तणावाचं प्रमाण वाढलं आहे. सोबतच चिडचिड होणं, एकटं राहण्याची सवय, भूक न लागणं, यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

कोरोना काळात ऑनलाईन कार्यपद्धतीमुळे मुलांचा स्क्रीनटाईम म्हणजेच मोबाईल बघण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळे सर्वचजण मोबाईलच्या आहारी गेल्याचं दिसून येतंय. YouTube, Instagram Reels रात्री उशीरापर्यंत जागून पाहिले जातात. याच कारणामुळे मेंदूला थकवा जाणवू लागल्याच्या तक्रारी वाढत आहे.

Instagram reels चा ट्रेंड सगळीकडेच झपाट्याने वाढत आहे. त्यात अनेकजण आपल्या कमाईचा मार्गही शोधतात आणि कमाई करतात. असं असल्यानेच अनेक तरूण तरूणी Instagram Reels या माध्यमाकडे वळत आहेत. हे 15-30 सेकंदाचेच व्हिडीओ असतात. पण त्यात तरुणवर्ग मात्र तासंतास गुंतून राहिल्याचं चित्र अलीकडे पहायला मिळतं.

सर्वांनी याबद्दल वेळीच दक्षता घेतली नाही तर गंभीर समस्यांना सामोरं जावं लागेल हे नेटकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवं.

ही शेवटची निवडणूक आहे असं समजून लढा- देवेंद्र फडणवीस

मोठी बातमी! संजय राऊतांना दिलासा नाहीच; राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More