बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वनअधिकारी दिपाली चव्हाणांची मन सुन्न करणारी सुसाईट नोट आली समोर!

अमरावती | मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दिपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.  उप वन संरक्षक विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे. दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांची सुसाईड नोट सापडली आहे.

दिपाली चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अपर प्रमुख प्रधान संरक्षक रेड्डी यांना ही सुसाईड नोट लिहिली आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये विभागीय वन अधिकारी विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. विनोद शिवकुमार यांनी मला वारंवार निलंबित करण्याची आणि चार्जशीट दाखल करण्याची धमकी दिली होती तसेच मला शिव्या देखील दिल्या. त्यांनी नेहमी मला नियम बाह्य काम करण्यास भाग पाडलं, असा आरोप दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.

मागे एकदा अतिक्रमणात गावकरी माझ्यावर अॅस्टाॅसिटी दाखल करणार होते. त्यावेळी शिवकुमार यांनी एसपींना बोलवून अॅस्टाॅसिटी लावतो अशी धमकी देखील दिली होती. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांना हे रेकाॅर्डिंग देखील ऐकवलं होतं. मी गर्भवती असताना त्यांनी मला तीन दिवस कच्च्या रस्त्यावरून फिरवलं. त्यामुळे माझा गर्भपात झाला, असंही त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.

रात्री मला भेटायला बोलवून मला अश्र्लिल भाषेत बोलत राहायचे. माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. माझ्या कामाचे पैसे देखील मला मिळाले नाही. माझ्या कमाईचे पैसे माझ्या आईला मिळावे अशी माझी इच्छा आहे. तर उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर कारवाई करावी अशी माझी शेवटची इच्छा आहे, अशी हद्यद्राव्य सुसाईट नोट दिपाली चव्हाण यांनी लिहिली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

अजित पवारांचा पुणेकरांना अल्टीमेटम; लॉकडाऊनसंदर्भात केलं मोठं वक्तव्य

पुण्यात लॉकडाऊन लागणार का?; वाचा अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील सर्व मुद्दे

युपीएच्या नेतृत्वाबाबत संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट, म्हणाले…

सरकारने जबरदस्तीने घरी बसवलं म्हणत IPS अधिकाऱ्याने केलं असं काही की…

“प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक कोटी रूपये, हेलीकाॅप्टर देणार आणि चंद्रावरही नेणार”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More