मुंबई | कोरोनानंतर सामान्यांपासून अगदी श्रीमंतापर्यत सर्वांनाच पैशांची चणचण भासत आहे. सिनेक्षेत्राला देखील याचा मोठा फटका बसला होता. ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. चर्चेचं कारण ठरलंय मालिकेतील कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यातील वाद… अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने दिग्दर्शक मंदार देवस्थळींवर आरोप केले आहेत. यानंतर दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहिली असून आपली बाजू स्पष्ट केली आहे.
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने काही दिवसांपूर्वी आपल्या इंस्ट्राग्राम पोस्टमधून ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतील कलाकारांचे आणि तंत्रज्ञाचे मानधन थकवल्याचा आरोप दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर केला होता. दिग्दर्शक मंदार देवस्थळी हे मराठी मालिकेत दबदबा असलेले दिग्दर्शक आहेत. त्यानंतर त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट लिहिली आणि या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे.
फेसबुक पोस्टमधून देवस्थळी म्हणतात, ” मी सर्वांशी मनापासून बोलतोय, मला पूर्ण जाणीव आहे की, प्रत्येकाला पैशांची गरज आहे. माझ्याकडून तुम्हा सगळ्यांच पेमेंट थकलंय आहे. तुमचं म्हणणं योग्यच आहे. तुम्ही तुमच्या जागी बरोबरच आहात. पण मी सुद्धा अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. मला देखील खुप लॉस झाला आहे. त्यामुळे आता माझी पैसे द्यायची खरंच परिस्थिती नाही. पण मी सगळ्यांचे पैसे परत देईन, अगदी टॅक्ससकट… मला थोडा वेळ हवा आहे. कोणाचेच पैसे बुडवायचे माझ्या मनात नाही. तशी माझी इच्छाही नाही.”
“मी खरंच वाईट माणूस नाहीये, माझी परिस्थिती वाईट आहे. यातून मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करतोय. देवाच्या कृपेने लवकर परिस्थिती बदलो इतकीच मनापासून इच्छा आहे. तुम्ही जो सपोर्ट केलाय त्याबद्दल तुमचा ऋणी आहे. माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास सहन करावा लागतोय त्याबद्दल मी तुमची माफी मागतो,” असं भावनिक उत्तर मंदार देवस्थळी यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मुंबईत खासदाराची आत्महत्या, अधिकारी व बड्या मंत्र्यांची नावं लिहून ठेवल्यानं खळबळ
आतुरता संपली; नवीन टाटा सफारी लाँच, किंमतही ठरली
कोरोना नियमांचं उल्लंघन, भाजप नेत्यासह तिघांवर गुन्हा दाखल
पुण्यातील ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण, अजित पवारांच्या बैठकीला होते उपस्थित!
‘…तर मला आज नातवंडे असती’; भाईजानने व्यक्त केली खंत!