बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाढत्या इंधन दराबाबत चिंता व्यक्त करत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं कारण, म्हणाल्या….

नवी दिल्ली | देशात वाढत्या इंधन दरवाढीमुळे सामान्य माणूस आर्थिक संकटात सापडला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे संपूर्ण देशाचं आर्थिक गणित कोलमडून पडलं आहे. विमानाच्या इंधनापेक्षाही गाड्यांमधील पेट्रोलच्या किंमती महाग झाल्याचं सध्या चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.

ज्या पद्धतीने देशात इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत, नवनवीन उच्चांक गाठत आहेत. त्यांचं मोठं आव्हान माझ्यासमोर आहे. अर्थ विभागातील आमची टीम देखील याकडे अभ्यासपूर्वक पद्धतीने पाहात आहे. ही अनिश्चितता माझ्यासाठी फार मोठी चिंतेची बाब आहे, असं निर्मला सितारमण यांनी म्हटलं आहे.

कोरोनाकाळात बसलेल्या आर्थिक फटक्यामधून सध्या भारतीय अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने देखील आहेत. यामध्ये प्रामुख्याने जागतिक बाजारपेठेत वस्तूचे भाव वाढले आहेत. तसेच इंधनाचे वाढणारे भाव देखील एक मोठं आव्हान आहे. त्याचा परिणाम देशातील महागाई वाढण्यासाठी होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या खर्च करण्यावर मर्यादा येत असल्याचं देखील निर्मला सितारमण यांनी सांगितलं.

दरम्यान, देशात पेट्रोलच्या किंमती या काही राज्यामध्ये 100 रूपयाच्या पार गेल्या आहेत. आज दिल्लीत पेट्रोलचा दर 105 रूपये इतका आहे. तर डिझेलची किंमत 94 रुपये पैसे प्रति लिटर आहे. काही ठिकाणी पेट्रोलबरोबर डिझेलने देखील शंभरी गाठली आहे. त्यामुळे सामान्य माणूस सध्या चिंतेत पडला आहे.

थोडक्यात बातम्या-

बाबा राम रहीमसह अन्य पाच साथीदारांना न्यायालयानं ठोठावली ‘ही’ मोठी शिक्षा

नेटफ्लिक्सच्या स्क्विड गेमने मोडले सारे रेकॉर्ड्स! तब्बल ‘इतक्या’ मिलियन डॉलर्सची कमाई

काय सांगता! विमानाच्या इंधनाची किंमत पेट्रोलपेक्षाही स्वस्त; काय आहे कारण?

‘मुलगा 18 वर्षाचा झाला असेल तर…’; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!

“वाॅण्टेड असलेल्या गृहमंत्र्यांना पण समोर येऊन उत्तर द्यायचं आवाहन करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More