मुंबई | राज्यभरात कडाक्याची थंडी पडली आहे. या जीवघेण्या थंडीनं सध्या नागरिकांना हैराण करुन टाकलं आहे. यातच अवकाळी पावसाच्या हजेरीनं तर आणखीनच चिंतेत टाकलं आहे.
थंडी सुरु होऊनही अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे.
पुढील दोन दिवस नागपूरसह विदर्भात थंडीची लाट राहणार असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मुंबईत आजही कडाक्याची थंडी अनुभवायला मिळतेय. मुंबईत पारा 16 अंशावर पोहोचला आहे. विदर्भात काल पासून थंडीची तीव्रता वाढत असल्याने पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवस राज्यात किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. या हिवसाळ्यामुळं शेतकरी प्रचंड हैराण झाले आहेत. पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
थोडक्यात बातम्या –
अमोल कोल्हेंविरोधात 26 जानेवारीला नारायणगावातील घराबाहेर सविनय आंदोलन
‘देशाचं पहिलं राष्ट्रगीत’ म्हणत कंगनाने शेअर केला व्हिडीओ अन् वादाला तोंड फुटलं
‘या’ जिल्ह्यात 15 दिवस जमावबंदीचा आदेश लागू; समोर आलं महत्त्वाचं कारण
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याची ही 5 लक्षणं समोर; लगेच व्हा सावध!
“2024ला नरेंद्र मोदींविरूद्ध प्रियंका गांधी पंतप्रधानपदाच्या दावेदार”
Comments are closed.