बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात ‘या’ भागात तीव्र उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा इशारा

मुंबई | यंदाच्या उन्हाळ्यानं (Summer) तर सर्व रेकाॅर्ड ब्रेक करत उच्चांक गाठला आहे. यंदाच्या रखरखत्या उन्हाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

एकीकडे तीव्र उष्णता पहायला मिळत आहे तर दुसरीकडे अवकाळी पाऊस कोसळत आहे. नागपुरात अनेक भागात हलक्या पावसानं नागरिकांना दिलासा दिला. पण या हलक्या पावसामुळे आज पुन्हा उकाडा वाढणार आहे. दुसरीकडे अमरावतीच्या नेरपिंगळाई भागात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

अमरावतीमध्ये पुढचे दोन दिवस तीव्र उष्णतेची लाट असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

यंदाचा उन्हाचा पारा एवढा आहे की उष्मघातानं अनेकांना आपला जीव गमवावा लगला आहे. एकीकडे कडाक्याचा उन्हाळा सुरु आहे तोच दुसरीकडे अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! नवाब मलिकांना सत्र न्यायालयाचा दिलासा

पुणे रेल्वे स्थानकावर आढळलेल्या बॉम्बसदृश वस्तूबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

“…तर तुम्हाला देखील याच कबरीत जावं लागेल”

‘पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला नाही औरंगजेबाकडे पाठवलं तर…’; नितेश राणे कडाडले

‘नया है आप!’, अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या दीपाली सय्यदना मनसेनं सुनावलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More