कोरोना नसलेल्या लोकांनाही काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्वाची माहिती
नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी रुग्णवाढ आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. त्यातच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने देशासह राज्यात शिरकाव केलाय. कोरोना नसलेल्या लोकांनाही काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका असल्याचं समोर आलं आहे.
ब्लॅक फंगस हा एक असा आजार आहे जो कोविड 19 महामारीपूर्वीही अस्तित्वात होता. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या आजाराबाबत शिकवले जाते. मधुमेह असणाऱ्या लोकांना या आजाराचा संसर्ग होऊ शकतो, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं आहे.
जर शरीरातील साखरेचं प्रमाण 700-800 पर्यंत पोहचतं तेव्हा त्याला डायबेटिस केटोसिडोसिस म्हणजे काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याचं म्हटलं जातं. हा आजार युवक आणि ज्येष्ठांमध्ये सर्वसामान्य आहे. न्यूमोनियासारख्या आजारांमुळेही हा गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यात आता कोरोनामुळे त्याची तीव्रता आणखी वाढली आहे, अशी माहिती डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.
कोविड 19 नंतर म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याशिवाय दुसऱ्या लाटेत स्टिराईडचा वापर वाढल्यानेही हा धोका असावा. योग्य तपास केल्याशिवाय काहीही सांगता येणार नाही, असं एम्समधील डॉ. निखील टंडन यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
शहरी भागातील एक तृतीयांश लोकांच्या शरिरात कोरोना अँटीबॉडी; सिरो सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
“राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल”
राज्याला मदत मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला पत्र लिहावं- रोहित पवार
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या पत्रानंतर अखेर रामदेव बाबांकडून वक्तव्य मागे!
Comments are closed.