बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाळासाहेबांचा फोटो काढला तर शिवसेनेची किंमत शुन्यापेक्षाही कमी”

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या आणि महाविकास आघाडीचे नेते यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलंच वाकयुद्ध रंगताना दिसत आहे. किरीट सोमय्या यांच्यावर कारवाईनंतर शिवसेनेने या कारवाईतून अंग झटकलं आहे. त्यानंतर आता भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेचा खरा चेहरा बाळासाहेब ठाकरे यांचा आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो कमी केला तर शिवसेनेची किंमत शुन्यापैक्षा कमी होईल, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक देखील केलं आहे.

प्रत्येक पक्षात नेतृत्व करणारे नेते प्रचंड क्षमतावान असतात. त्यांच्याकडे काम करण्याची आणि नियोजन करण्याची क्षमता असते. निश्चितपणे नरेंद्र मोदी भाजपचे कर्णधार आहेत. नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे. 2 खासदार असलेला पक्ष आज 303 खासदारांवर पोहचला आहे. येत्या 2024मध्ये ही संख्या आणखी वाढेल असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपने युती तोडली असं म्हणणं म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य आहे. शिवसेनेने युतीसाठी कधीही प्रयत्न केले नाहीत. आमच्यासाठी मोदी देशगौरव आहेत आणि जगासाठी विश्वगौरव आहेत, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“ज्याच्या घराला कधी छत नव्हतं, त्याला आज काॅंग्रेसने मुख्यमंत्री बनवलंय”

सासू सासऱ्यांना आला सूनेवर संशय, नात्वाचा जन्म होताच केली DNA टेस्ट अन्…

देवेंद्र फडणवीस दबंग नेते, ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात- चंद्रकांत पाटील

ऐकावं ते नवलंच! रामदर्शनाला जाताना दोन्ही मुलींना गमावलं दोन वर्षांनी त्याच तारखेला….

“कोणालाही द्यायला आमचं ऑफर लेटर असंच मैदानात पडलेलं नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More