फेसबुकवर फेक आयडी बनवण्यात भारत आघाडीवर…

मुंबई | फेसबुकवर फेक आयडी बनवण्यात भारत आघाडीवर आहे. फेसबुकनं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आलीय. 

जगभरात एक दोन नव्हे तर तब्बल 20 कोटी फेक फेसबुक अकाऊंट्स आहेत. यातील सर्वाधिक अकाऊंट भारतात आहेत. भारतासोबतच फिलीपाईन्स, इंडोनेशिया यासारख्या विकसनशील देशांमध्ये फेक अकाऊंट्स बनवण्याचं प्रमाण मोठं आहे. 

वर्ष 2017 मध्ये एकूण यूझर्स आणि फेक अकाऊंट्समध्ये मोठी वाढ झालीय. 31 डिसेंबर 2017 पर्यंत जगभरात तब्बल 2.13 अब्ज यूझर्स असून त्यामध्ये 10 टक्के अकाऊंट्स फेक असल्याचं आढळून आलं आहे. तुमच्या अकाऊंट्समध्येही असे अनेक फ्रेंड असण्याची शक्यता आहे.