मुंबई | फेसबुक मेसेंजरद्वारे एकमेकांना पैसेही पाठवता येणार आहे. पे पलनं यासाठी फेसबुकशी करार केला आहे.
फेसबुक मेसेंजरचा वापर गप्पा मारणे, व्हिडिओ तसेच ऑ़डिओ कॉलिंग करणे यासाठी होतो. मात्र आता पेपलच्या मदतीनं एका बटणावर क्लिक केलं, की आपल्या मित्रयादीतील मंडळींना पैसेही पाठवता येणार आहेत.
यासाठी वेगळं अॅप वापरण्याची गरज नाही. सध्या फक्त अमेरिकन नागरिकांना याचा फायदा घेता येणार आहे. त्यानंतर सगळ्यांसाठी ही सुविधा खुली होईल.
Comments are closed.