बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#Facebookdown | फेसबुक, इन्स्टाग्राम मेसेंजरसह व्हॅाट्सअपची सेवा ठप्प!

नवी दिल्ली | प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म असलेले फेसबुकसह त्याच्याशी संलग्न असलेल्या मेसेंजर आणि व्हाॅटसअप, इन्स्टाग्रामसह सेवा जगभरात काही काळासाठी ठप्प झाली होती. तिन्ही प्लॅटफाॅर्मवर यूझर्सना अडचणी येत होत्या मात्र काही काळातच या सेवा सुरळीत करण्यात फेसबुकला यश आलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सर्वात आधी व्हाॅटसअप डाऊन झाल्याचं समोर आलं. यामध्ये यूझर्सला मेसेज पाठवताना, फोटो पाठवताना तसेच फोटो डाऊनलोड करताना अडचणी येत होत्या. तसेच जीआयएफ किंवा स्टीकरही जात नव्हते. दुसरीकडे मेसेंजरवरही मेसेज जात नसल्याचं पहायला मिळालं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ठप्प होण्यमागे डाऊन डेटेक्टरमुळे झाल्याची माहिती समजत आहे. दुपारी 4.45 नंतर अशा प्रकारचा टेक्निकल प्रोब्लेम दिसून आला आणि 8.30 च्या नंतर

फेसबुकही डाऊन झाल्याचं पहायला मिळालं त्यामुळे यासंदर्भात बोलण्यासाठी यूजर्सनी नेहमीप्रमाणे ट्विटरचा सहारा घेतलेला दिसला. ट्विटरवर व्हाॅटसअप डाऊन आणि फेसबुक डाऊन अशाप्रकारे दोन हॅशटॅग ट्रेंड होताना पहायला मिळाले.

दरम्यान,  यूजर्सनी नाराजी तर व्यक्त केलीच मात्र फेसबुक आणि संबंधित सेवांची मिम्सद्वारे खिल्ली देखील उडवलेली पहायला मिळाली.

थोडक्यात बातम्या- 

“आमचे 20 आमदार कमी पडले, जर आम्ही धोका झाला असता तर…”; चंद्रकांत पाटलांचं शिवसेनेवर टीकास्त्र!

“निवडणुकीत लक्ष्मी आली की दरवाजा उघडून घ्या पण, मतदान भाजपलाच करा”

‘उत्तर प्रदेश हे नवं जम्मू काश्मीर आहे’; माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुलांचं टीकास्त्र!

‘या’ संशोधनासाठी डेव्हिड ज्युलियस आणि आर्देम पटापाउटियन यांना वैद्यकशास्त्रातील 2021 चा पुरस्कार

‘चिटिंग करणाऱ्यांचं….’; नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर एक्स बॉयफ्रेंडचा समंथावर निशाणा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More