वाचाळवीरांचं तोंड बंद करणं सोपं, फेसबुकचं भन्नाट फिचर

मुंबई | फेसबुकवर आता वाचाळवीर मित्र किंवा पेजची तात्पुरती बोलती बंद करणं शक्य होणार आहे. फेसबुकनं यासाठी स्नूज नावाचं नवं फिचर युझर्संना प्रदान केलंय. 

मित्र किंवा पेजला अनफ्रेंड किंवा अनफॉलो न करता या फिचरचा वापर करता येणार आहे. हे फिचर्स वापरल्यास संबधिताचा फि़ड 30 दिवस तुम्हाला दिसणं बंद होईल.

फेसबुकच्या श्रुती मुरलीधरन यांनी एक ब्लॉग पोस्ट केलाय. ज्यामध्ये युझर्संना त्यांना हव्या त्या गोष्टी पाहण्याचा आणि न पाहण्याचा अधिकार असल्याचं म्हटलंय.