मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना हाताशी धरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 दिवसाचं सरकार स्थापन केलं होतं. या काळात फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा केली होती. ही घोषणा फसवी असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे.
फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून शेतकऱ्यांसाठी 5380 कोटींच्या मदतीची घोषणा केली होती. बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याचसंबंधीच्या कागदपत्रांची मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री सचिवालयाला माहिती मागितली.
23 नोव्हें 2019 ते 26 नोव्हें. 2019 या काळात एकही फाईल मुख्यमंत्री कार्यलयात आली नाही किंवा बाहेर गेली नाही, अशी माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे फडणवीसांनी शेतकऱ्यांना केलेली मदत फसवी असल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, माहिती अधिकारातून बाहेर आलेल्या माहितीतून फडणवीस उघडे पडले आहेत. त्यामुळे विरोधक त्यांच्यावर तुटून पडण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
धर्मामुळे माणूस राक्षस नाही तर देव होण्याच्या मार्गाने जातो- मोहन भागवत
शेतकरी कर्जमाफी म्हणजे तात्पुरती मलमपट्टी- देवेंद्र फडणवीस
महत्वाच्या बातम्या-
“कुठला अंगारा, कुठला बाबा यांच्याकडे आहे माहित नाही, हे पुन्हा मंत्री झाले”
परभणीच्या सर्वसामान्य तरुणासोबत शरद पवारांच्या दिलखुलास गप्पा; व्हिडीओ व्हायरल
कोपर्डी खटला: सरकारी वकील गैरहजर राहिल्याने संभाजीराजेंचा संताप
Comments are closed.