मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. रूग्णालयातून बाहेर येण्यापू्र्वी भाजप नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रूग्णालयात जात नवनीत राणांची भेट घेतली होती.
नवनीत राणांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी संताप व्यक्त करत ठाकरे सरकारवर (Thackeray Goverment) ताशेरे ओढले आहेत. नवनीत राणा यांची तब्येत स्थिर आहे. परंतू त्यांना एकूणच जी वागणूक देण्यात आली ती अतिशय गंभीर आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
गुन्हेगारांनाही जी वागणूक दिली जात नाही तशाप्रकारची वागणूक राणा दांपत्याला देण्यात आली आहे. या सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली आहे.
दरम्यान, रूग्णालयातून बाहेर आल्यानंतर नवनीत राणांनी देखील ठाकरे सरकारला धारेवर धरलं. श्रीरामांचं नाव घेणं गुन्हा असेल तर मी 14 दिवस नाही तर 14 वर्षे तुरूंगात राहण्यास तयार आहे, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं होतं.
थोडक्यात बातम्या-
रूग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणांची तोफ कडाडली, म्हणाल्या…
संजय राऊतांचा ‘चवन्नीछाप’ असा उल्लेख करत रवी राणांचा हल्लाबोल
Sanjay Raut| संजय राऊतांची मोठी घोषणा, म्हणाले…
“धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं”
“सहकाऱ्यांना मागे सोडून पुढे पळणारा मुख्यमंत्री नसावा”
Comments are closed.