बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरद पवारांना पंतप्रधान पद मिळालं नाही म्हणून…’; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

गोवा | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यांवरून राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या वक्तव्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला होता. त्यानंतर फडणवीस यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते सध्या गोव्याच्या दौऱ्यावर असून आगामी निवडणुकासंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.

शरद पवार मोठे नेते आहेत आणि मोठ्यांना उत्तरे द्यायाची नसतात. आपण असेही म्हणू शकतो की, त्यांना देशात पंतप्रधानपद मिळालं नाही म्हणून त्यांच्या मनात त्या वेदना सलत आहेत. या सगळ्या गोष्टी एक राजकीय विरोधक म्हणून राजकारणात मला सांगव्या लागतात. सत्ता आम्हाला पाहिजे हे कुठल्याही राजकीय पक्षाला वाटते, परंतु आम्ही अजूनही हातपाय गाळून बसलेलो नाही. तसेच राज्यात विरोधी पक्षाचे उत्तम काम आम्ही करत आहोत, त्यामुळे आम्हाला कुठलीही चिंता नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गोव्यामध्ये भाजपला प्रचंड प्रमाणात लोकांनी प्रतिसाद दिला आहे. मनोहर पर्रिकरांची परंपरा याठिकाणी अजूनही कायम आहे. सध्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील चांगले काम करत आहेत. तसेच मोदींबद्दल देशात सकारात्मकता असल्यामुळे गोव्यात देखील भाजप विजयी होईल, अशी आशा आहे. त्यासाठी आमची पूर्ण बहूमताची तयारी करत आहोत, यावेळी गोव्यात भाजपला बहूमत मिळणार, असा विश्वास देखील फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, फडणवीसांच्या वक्तव्यांवर शरद पवारांनी समाचार घेतला होता. राज्यात मी चार वर्षे मुख्यमंत्री होतो, परंतु माझ्या हे कधीच लक्षात राहिलं नव्हतं. ही आमची कमतरता आहे. असा उपरोधिक टोला पवार यांनी फडणवीसांना लगावला होता. त्यावरून अनेेक नेत्यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या.

थोडक्यात बातम्या-

दिवाळीनिमित्त BSNLची खास ऑफर! ‘या’ महिन्यात मिळेल फुकट डेटा-काॅलिंग

मंदाकिनी खडसेंना तुर्तास तरी अटक नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

“दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा तसेच कोणत्याही वर्गाचा नाही”

नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर NCB ‘या’ कारणामुळे न्यायालयात जाणार

200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी नोरा फतेहीला ईडीने बजावलं समन्स

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More