बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ओबीसींच्या आरक्षणासाठी फडणवीसांनी मार्ग सांगावा, त्यांनी सत्तेत येण्याची गरज नाही”

नांदेड | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यापासून राज्यातील वातावरण तापलं आहे. ओबीसी समाजाच्या हक्काचे आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी भाजपकडून काल सकाळपासून चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालूच आहेत. नुकतंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांंनी सत्तेत आल्यास अवघ्या चार महिन्यात ओबीसींना आरक्षण मिळवून देतो, असं म्हटलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर आरक्षणाचा प्रश्न सोडवणार आहेत. म्हणजेच सत्तेत नसल्यावर ते काहीच करणार नाहीत. म्हणजे हा फडणवीसांचा दुटप्पीपणा आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी फडणवीसांनी फक्त मार्ग सांगावा आम्ही तिढा सोडवतो. त्यासाठी त्यांनी सत्तेत येण्याची गरज नाही, अशा शब्दात पाटलांनी फडणवीसांचा सामाचार घेतला आहे. आज नांदेड येथील राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

तसेच ओबीसींचा एवढाच कळवळा असता तर फडणवीसांनी भुजबळांवर एवढा अन्याय करत तुरुंगात खितपत ठेवलं नसतं. खडसेंसारख्या नेत्याला त्रास देऊन पक्ष सोडायला भाग पाडलं नसतं. यामुळे फडणवीसांचं हे आंदोलन केवळ हास्यास्पद आहे, अशी देखील टीका पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात केंद्र सरकारने आतापर्यंत सीबीआय, ईडी आणि आरबीयआयचा वापर करणे सुरु केले आहे. आरबीआयने सहकारी बँकामध्ये आमदार, खासदार आणि नगरसेवक यांना संचालक होता येणार नसल्याची नियमावली केली आहे. त्यामुळे चांगल्या चालत असलेल्या संस्था बंद करण्याचा हा उद्योग आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहेत, खातात शिवसेनेचं पण जागतात शरद पवारांच्या निष्ठेला”

देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, पण चिंता कायम, पाहा आकडेवारी

पुण्यातील 91 गावं कोरोना हाॅटस्पाॅट म्हणुन घोषित; कमी झालेली संख्या पुन्हा वाढली

“कंगनाचा इंदिरा गांधी चित्रपट फ्लॉप होणार, कारण…”

माझ्या 100 वर्षीय आईनेही लस घेतली, घाबरू नका- नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More