बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामधील अजितदादांचं राज्य’; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडी सरकारसाठी देवेंद्र फडणवीस यांनी अगदीच वेगळी उपमा आपल्या भाषणात दिली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सत्तेत असलेल्या सरकारचा केलेला उल्लेख ऐकून सत्ताधारी पक्षातील सर्वच सदस्य हसू लागले.

जीएसटीच्या दरवाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक फिटमेंट कमिटी तयार करण्यात आलेली असं सांगताना फडणवीस यांनी या कमिटीमध्ये कोणकोणती राज्यं होती हे वाचून दाखवलं.

राजस्थान म्हणजे काँग्रेसचं राज्य. पश्चिम बंगाल म्हणजे ममता बॅनर्जींचं राज्य. तमिळनाडू म्हणजे डीएमकेचं राज्य. बिहार म्हणजे नितीश कुमारांचं राज्य. उत्तर प्रदेश म्हणजे भाजपाचं राज्य. कर्नाटक भाजपाचं राज्य, अशी यादी फडणवीस यांनी वाचून दाखवली. तसेच महाराष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृ्त्वामधील अजितदादांचं राज्य, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More