भारतीय संस्कृती आणि मूल्यं रुजविण्यासाठी संघाचं ‘कुटुंब प्रबोधन’!

नागपूर | भारतीय संस्कृती आणि देशी मूल्ये रुजविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कुटुंब प्रबोधन नावाची मोहीम हाती घेतली आहे.

नागपुरात सध्या ही मोहीम राबविला जात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. 

सणासुदीला पाश्चात्य कपड्यांऐवजी कुर्ता पायजमा किंवा साडी परिधान करावी. केक कापून, मेणबत्त्या विझवून वाढदिवस साजरा करु नये. आठवड्यातील किमान एक दिवस घरातील सगळ्यांनी एकत्र येऊन गप्पा माराव्यात. त्यात चित्रपट, राजकारण, क्रिकेट अशा विषयांना स्थान नसावे, असं हे प्रबोधन सांगतं.

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या