बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देऊळबंद चित्रपटाचे दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी यांचं निधन

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गीतकार ,लेखक आणि दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. प्रणीत कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल अभिनेते प्रविण तरडे यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. प्रणीत कुलकर्णी यांचं दीर्घ आजाराने निधन झालं असून वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे.

प्रणीत कुलकर्णी हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार ,लेखक आणि दिग्दर्शक होते. त्यांनी प्रविण तरडेंसोबत सर्वत्र गाजलेला ‘देऊळबंद’ या सिनेमाचं दिग्दर्शक केलं होतं. त्यासोबतच ते उत्तम गीतकारही होते. देवऊळबंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, आ रा रा खतरनाक, उन उन वठातून, आभाळा आभाळा, गुरूचरीत्राचे कर पारायण, हबीर तु खंबीर तु अशी अनेक सुपरहिट गाणी लिहिली आहेत.

प्रविण तरडे आणि प्रणीत यांची खूप जुनी मैत्री होती. फिरोदिया करंडक स्पर्धा गाजवून प्रणित कुलकर्णी यांचा कलाक्षेत्रातील प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी गीतलेखन आणि ऑल द बेस्ट या टीव्ही मालिकेचे लेखन दिग्दर्शन केलं होतं. तसेच लोकप्रिय झालेल्या ‘लक्ष्य’ या मालिकेचंही लेखक होतेे.

गीतकार आणि म्युझिक अल्बमचा निर्माता म्हणून प्रणित यांनी बराच काळ काम केलं आहे. प्रविण तरडे आणि प्रणीत यांना सर्जनशील निर्मिती करण्याच्या वेडानं दोघांनी देऊळबंद हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. सिनेमाचं लेखनही त्यांनी मिळूनच केलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

देऊळबंद चित्रपटाचे दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी यांचं निधन

भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवल्याचा भाजपचा आरोप, अजित पवार म्हणाले…

“…तर पुढच्या दोन आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात येईल”

‘पनवतीयों का बाप है ये बॉस’; चक्रीवादळावरून नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

“चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा मोदी-शहांचा डाव, राऊत मुंबईतच अडवणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More