मुंबई | प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर नेहमी सोशल मिडीयावर सतत झळकत असते. ती कोणत्या न कोणत्या कारणांवरुन नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळत असते. तिने आपल्या सुरेख आवाजाने सर्वांचीच मनं जिंकलेली आहेत. नेहाने नुकताच काही दिवसांपूर्वी तिच्या आजारपणाविषयी खुलासा केला आहे.
टेलीव्हिजनवर सध्या चालू असलेलं ‘इंडियन आयडाॅल 12’ची ती परीक्षक असलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. या सीझनचं परिक्षण करत असताना तीने या मंचावर तिच्या आजारपणाविषयी खुलासा केला. या शोच्या पुढच्या भागांमध्ये आईवर विशेष भाग होणार आहे. यामध्ये बोलताना नेहाने आपल्या आजारपणाविषयी सांगितलं.
आपल्या आजारपणाविषयी बोलताना नेहा कक्कर म्हणाली, मला ‘एंग्जाइटी’चा त्रास आहे. यावेळी नेहा भावूक झाल्याची दिसून आली. चंदीगढमधून आलेल्या अनुष्काने ‘लुका छुपी’ हे गाणं सादर केलं. त्यामुळे नेहा जास्त भावूक झाली. भावूक झाल्यानं नेहानं तिला ‘एंग्जाइटी’चा त्रास असल्याचं सांगितलं.
दरम्यान, नेहा कक्कर हे अतिशय नावाजलेलं नाव असून तिच्या गाण्यानं लोकांना वेडं लावून टाकलं आहे. नेहाने तिच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी बाॅलिवूडला दिली आहेत. नुकतेच नेहाने गायक रोहनप्रित सिंह याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळेही नेहा सतत चर्चेचा भाग बनत होती.
थोडक्यात बातम्या –
पोलीस मारहाण प्रकरणात राज्यातील ‘या’ भाजप आमदाराला अटक
मारुती सुझुकी देणार ग्राहकांना पर्याय; पेट्रोल-डिझेलपासून सुटका
…तर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करावा लागेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाचा धसका! आता ‘या’ जिल्ह्यात घेण्यात आला संचारबंदीचा निर्णय
कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे अमरावती शहरात ‘इतक्या’ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर