बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही’ प्रसिद्ध गायिका लवकरच करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

मुंबई | सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय. वैशाली माडे या 31 मार्चला मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत, अशी माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, कला, साहित्य आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ‘एबीपी माझा’ शी बोलताना ही माहिती दिली आहे. वैशाली माडे यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.

वैशाली माडे या 2008 मध्ये ‘झी मराठी’च्या मराठी ‘सा रे ग म प’च्या पर्वाच्या विजेत्या ठरल्यात. हाच त्यांच्या आयुष्याचा ‘टर्निंग पाँईंट’ ठरला. वैशाली माडे या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत. वैशाली माडे यांचा एका सुप्रसिद्ध गायिकेपर्यंतचा प्रवास मोठ्या संघर्षासह अनेक चढ-उतारांचा राहिला आहे. याशिवाय अनेक मराठी मालिकांची ‘टायटल साँग’ म्हाडे यांनी गायिली आहेत.

दरम्यान, वैशाली म्हाडे यांना त्यांच्या गीतांसाठी अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले. तर अनेक नामवंत पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांत अनेक दिग्गज मराठी कलाकारांनी राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीत प्रवेश केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रात कोणासोबत सरकार बनवणार… अमित शहांच्या नव्या वक्तव्याने मोठी खळबळ

अल्पवयीन बालिकेचा विवाह रोखण्यात यश ; मंत्री यशोमती ठाकूर यांची धडक कारवाई

शेतकऱ्यांचा संताप अनावर; भररस्यात भाजप आमदाराचे कपडे फाडून केली मारहाण

धक्कादायक! भाजप नगरसेविकेच्या मुलाने पिस्तुलाने स्वत:वर झाडून घेतली गोळी

सावधान!!! महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार; आज तब्बल एवढ्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More