सरकारने शेतकऱ्यांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य केल्या?

मुंबई | किसान लाँग मार्चमधील शेतकऱ्यांच्या जवळपास सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. कोण-कोणत्या मागण्या मान्य झाल्या पाहुयात थोडक्यात…

-जीर्ण रेशनकार्ड 6 महिन्यात बदलून देणार

-गायरान जमिनीचे दावे-अतिक्रमण नियमीत करणार

-विदर्भ आणि मराठवाड्यातील बोंडअळी आणि गारपीटीबद्दल प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे, मात्र केंद्राच्या उत्तराची वाट न पाहता मदतीचं वाटप सुरु करणार

-2001 पासून थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी

-दुधाचे दर ठरवण्यासाठी वेगळी बैठक बोलवणार

-राज्य कृषिमूल्य आयोग हमीभाव ठरवणार, समितीत 2 किसान सभेचे प्रतिनिधी घेणार

-ऊस दर ठरवण्यासाठीही समिती गठीत करणार

-देवस्थानच्या ईनामी जमिनीवर लवकरच निर्णय घेणार

-संजय गांधी निराधार योजनेतील मानधन वाढवणार

-6 महिन्यात वनहक्क कायद्याचे दावे निकाली काढणार