शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर लातूर-बार्शी रस्ता रोखला

उस्मानाबाद | शेतकरी कर्जमाफीची ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीची अट काढून टाकावी, यासह इतर मागण्यांसाठी कसबे तडवळे गावातील शेतकऱ्यांनी लातूर-बार्शी मार्ग रोखून धरला होता. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. 

३० जून २०१६ पर्यंत थकबाकीची अट काढून टाकावी, यासह १० हजार रुपयांचं कर्ज त्वरीत द्यावं, निराधारांचा रखडलेला पगार मिळावा आणि गेल्या चार महिन्यांपासून रखडलेला रॉकेलचा पुरवठा पुर्ववत करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.