Top News देश

शेतकऱ्यांचे आंदोलन भाजपच्या अंगलट, हरियाणातील खट्टर सरकार संकटात

नवी दिल्ली | गेले 14 दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलन आता अतिशय आक्रमक होऊ लागले असून याची झळ आजूबाजूच्या राज्यामंधील राजकाणावरही लागू लागली आहे. त्यामुळे हरियाणील बहुमतापासुन दूर असलेल्या भाजपच्या मनोहरलाल खट्टर यांचे सरकार संकटात आले आहे.

8 डिसेंबर रोजी हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची बैठक पार पडली. यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या त्यांच्या मतदारसंघात बसणारा फटका यावर चर्चा करण्यात आली. तसेच दुष्यंत चौटाला यांनी जननायक जनता पार्टी सत्तास्थापनेसाठी दिलेला टेकू काढून घेण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे.

जेजेपीचे आमदार देवेंदर बबली यानी सांगितले की, बबली यांनी सांगितले की, ही बैठक शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थितीवर होती. आमचा पक्ष हा शेतकरी आणि मजूरांचा आहे. आमचा मतदारही हाच आहे. यामुळे आमच्यावर दबाव असून शेतकरी आंदोलनावर लवकरच तोडगा काढायला हवा.

तसेच आम्ही शेतकऱ्याच्या हिताला आधीपासूनच प्राधान्य देत आहोत. त्यामुळे सरकारने एवढेही ताणू नये की ही वेळ यावी. शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या मतदारांनी आम्हाला इथे पाठविले आहे. आज सहकारी पक्ष म्हणून सरकारमध्ये काम करत आहोत. उद्या जर कोणाचे शोषण झाले तर आम्ही डोळे बंद करू शकत नाही, असा इशाराही बबली यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

गांधी कुटुंंबाने आता काँग्रेस सोडावी- रामचंद्र गुहा

पुणे तिथे काय उणे! चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात ‘हे’ घडलं-शिवसेना

देशातील अॅलोपथी डॉक्टरांचं आज कामबंद आंदोलन

…तर मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत कर्फ्यू-पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल

’31 डिसेंबरपर्यंत तो फलक हटवला नाहीतर…’; तृप्ती देसाईंचा साई संस्थानला इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या