बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांना कोरोनाची लस द्यावी- राकेश टिकैत

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन चालू आहे. केंद्र सरकार अद्यापही यावर तोडगा काढू शकलं नाही. देशात कोरोना पुन्हा वर काढत आहे. देशात सध्या 1 मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा चालू झाला आहे. यांच्यासह देशभरातील अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे राकेश टिकैत यांनी एक मागणी केली आहे.

कोरोना त्यासंदर्भात देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पाळल्या गेल्या पाहिजेत. जी लोकं आंदोलनस्थळी बसले आहेत त्यांनाही कोरोना लस दिली गेली पाहिजे. मी स्वत:देखील कोरोना लस घेईन, असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

आंदोलन स्थळावर आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आहोत. आंदोलक शेतकऱ्यांप्रमाणे कारागृहात बंद असलेल्या कैद्यांनाही कोरोनाची लस दिली गेली पाहिजे, असंही टिकैत यांनी म्हटलं आहे. एकीकडे शेतकरी आंदोलन करत असलेल्या स्थळांवर कोरोनासंदर्भातील नियम, सोशल डिस्टन्सिंग, मास्क यांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे शेतकरी आंदोलकांसाठी कोरोना लसीची मागणी टिकैत यांनी केली आहे.

दरम्यान, काही खासगी कंपन्यांनी नवीन कृषी कायद्यांच्या पार्श्वभूमीवर गोदामे बांधण्यास सुरुवात केली आहे. अन्नधान्यांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. कृषी कायदे मागे घेतले नाहीत तर या कंपन्यांची गोदामे शेतकऱ्यांकडून लक्ष्य केली जातील, अशा इशाराही राकेश टिकैतांनी केंद्राला दिला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

पुण्यात लुटमारीसाठी दुकानदारावर गोळीबार; पोलिसांनी रचला सापळा आणि…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकत सुर्यकुमारने रचला इतिहास, पाहा व्हिडीओ

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!

फक्त याच नाही, मागच्या सरकारने देखील अन्यायच केला- ज्येष्ठ IPS अधिकारी संजय पांडे

…अन् प्रवाशांनी खचाखच भरलेली रेल्वे जेव्हा उलटी धावायला लागते, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More