Top News

शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा बातचितचा प्रस्ताव फेटाळला!

नवी दिल्ली | शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारचा प्रस्ताव फेटळला आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावात कोणत्याच गोष्टी स्पष्टपणे नमूद नसल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे.

शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावावर चर्चा केली. या चर्चेत एकमताने हा प्रस्ताव फेटाळण्यात आलं. त्यानंतर शेतकरी संघटनांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

भारत सरकार शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आलं आहे. शेतकऱ्यांनी नेहमी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे, असं स्वाराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी सांगितलं.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं गेल्या 28 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र अजूनही सरकारला त्यात यश आलेलं नाही.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाच्या आणखी एका प्रकारानं ब्रिटनमध्ये हाहाकार!

मराठा समाजासाठी महाविकासआघाडी सरकारने घेतला हा मोठा निर्णय!

“जोपर्यंत राज्यात 370 कलम लागू होत नाही तोपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही”

‘…तर मुंबई महापालिका कंगणाच्या बांधकामाची तोडफोड करु शकते’; न्यायालयाचा कंगणाला दणका

“मोदी देतील तो दर शेतकऱ्यांनी घ्यावा हे फडणवीसांनी बांधावर जाऊन सांगावं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या