बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शेतकऱ्यांनी दिल्ली, हरियाणामध्ये आंदोलन करावं पंजाबला त्रास देऊ नये”

नवी दिल्ली | देशातील महत्वाच्या राजकीय प्रभाव पाडणाऱ्या मुद्द्यांमध्ये शेतकरी आंदोलनाचा समावेश होतो. गेले 10 महिने शेतकरी आंदोलन चालू आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. दिल्लीपासून सुरू झालेलं आदोलन आता हरियाणा आणि पंजाबमध्ये जोर धरताना पहायला मिळत आहे. मात्र अशातच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे.

पंजाब सरकार नेहमी शेतकऱ्यांसोबत आहे. आमच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणल्या आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी पंजाब राज्याच्या बाहेर आंदोलन करावं, असं आवाहन अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. दिल्ली आणि हरियाणा मध्ये आंदोलन करण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री होशियारपुरच्या मुखलियाना गावात कार्यक्रमात बोलत होते.

पंजाबमध्ये खुप ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन राज्याच्या हिताचं नाही. यामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीवर विपरित परिणाम होतं आहे. दिल्ली आणि हरियाणात आंदोलन करणं योग्य आहे, असंही अमरिंदर सिंग म्हणाले आहेत.

दरम्यान, अमरिंदर सिंग यांच्या या वक्तव्याला शेतकरी आंदेलनकर्ते काय उत्तर देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पंजाब आणि हरियाणा या राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी आहेत. त्यामुळे पंजाब आणि हरयाणा सरकार यांच्यातील संबंध आधीच ताणले गेले आहेत.

थोडक्यात बातम्या 

दरेकर, महिलांची माफी मागा नाहीतर गाल आणि थोबाड रंगवू- रुपाली चाकणकर

शेतकरी बांधवांनो खचून जाऊ नका, सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी- धनंजय मुंडे

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

अमेरिकेचा मोठा निर्णय! अफगाणिस्तानला करणार ‘इतक्या’ मिलीयन डाॅलर्सची मदत

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More