बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंनी केला ‘हा’ नवा संकल्प

मुंबई | महाराष्ट्र हे शेतकऱ्यांचं राज्य आहे. काही कारणास्तव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आत्महत्या चिंतेची बाब आहे. आज नवोदित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषीदिनानिमित्त आत्महत्या मुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न करू असा संकल्प केला आहे, अशी माहिती शिंदे समर्थक गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यामांशी बाेलताना दिली.

मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. तेथे आपत्ती व्यवस्थापन बैठक घेण्यासाठी मुंबईला गेले आहेत. एक मुख्यमंत्री आहेत जे राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कल्पनाही नव्हती ते उपमुख्यमंत्री होणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये एवढी जाण आणि जिद्द आहे की एकत्र आल्यास महाराष्ट्र बदलू शकतात, असंही दीपक केसरकर म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आमदारांनी केलेल्या वर्तनाबद्दल विचारलं असता आनंदाच्या भरात काही चुका झाल्या. थोडासा तोल गेला. यापुढे असे प्रकार घडणार नाही, असं देखील केसरकर यांनी स्पष्ट केलं. त्यांनी सांगितल.

दरम्यान, राहिलेले विकास प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत. जलशिवार, मेट्रो यांसारखे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करू, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्राज्ञानाच्या आधारे शेतीला प्राधान्य देऊ असं एकनाथ शिंदे माध्यामांशी बाेलताना म्हणाले.

थोडक्यात बातम्या 

काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल…’, शिंदे सरकारमध्ये बापूजी पाटलांना मंत्रीपद मिळणार ?

‘तुमच्यामुळे देशाची बदनामी झाली, टीव्हीवर येऊन माफी मागा’; नुपूर शर्मांना सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं

‘हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही’; उद्धव ठाकरे अखेर स्पष्टच बोलले

“जगभरात लोकशाहीचा डंका वाजवत फिरायचं आणि आपल्याच…”

मोठी बातमी! सत्तेत येताच ठाकरे सरकारचे दोन निर्णय शिंदे-फडणवीसांनी बदलले

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More