देश

‘या’ अटीशर्तींसह शेतकरी सरकारसोबत चर्चा करण्यास तयार!

नवी दिल्ली | मोदी सरकारकडून पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रण आले आहे. मात्र शेतकऱ्यांनी सरकारच्या या बैठकीत केवळ कृषी कायदा मागे घेणं आणि एमएसपी यावरच चर्चा होईल, असं स्पष्ट केलंय.

शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या किसान संयुक्त मोर्चाने देखील सरकारच्या प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर 29 डिसेंबरला आंदोलक शेतकऱ्यांच्या समन्वय समितीची बैठक घेण्याचा निर्णय घेतला.

सिंधु बॉर्डरवर किसान संयुक्त मोर्चाची नुकतीच बैठक झाली. बराच वेळ चाललेल्या या बैठकीनंतर शेतकऱ्यांनी सरकारसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या बैठकीत चर्चेसाठी या शेतकऱ्यांनी सरकारसमोर आपला अजेंडा ठेवलाय.

दरम्यान, सरकार आणि शेतकऱ्यांमधील या चर्चेत काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवार यांना संधी द्या”

नव्या वर्षात देशासाठी ‘हा’ संकल्प करा- नरेंद्र मोदी

एसटीचा प्रवास आता होणार अधिक वेगवान; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

“चंद्रकांतदादांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणजे देवेंद्र फडणवीसच”

धनगर आरक्षणावरुन जयंत पाटलांचा भाजप सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या