बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू, लेकीची जळत्या चितेत उडी

जयपूर | राजस्थानमधील बाडमेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वडिलांच्या चितेत मुलीने उडी घेतल्याची घटना घडली आहे. यात 30 वर्षीय महिला गंभीररित्या भाजली आहे.

बाडमेरमध्ये रॉय कॉलनीमध्ये राहणाऱ्या जयराम दास यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली. जयराम दास यांच्या चितेला मुखान्गी देण्यात आला. मात्र काही सेकंदाने 30 वर्षीय मुलगी चंद्रकला हिनेही चितेमध्ये उडी घेतली.

चंद्रकलाची मोठी बहिण पिंकीने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत चंद्रकला 60 टक्के भाजली होती. यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चंद्रकला 60 टक्के भाजल्याने तिची प्रकृती नाजूक आहे.

दरम्यान, कळंब तालुक्यातील अंदोरा याठिकाणी अशीच घटना घडली. येथील एका तरुण मुलाचा कोरोनामुळं मृत्यू झाल्यानं आईनं अन्नत्याग केला होता. एकुलत्या एक मुलाचा अशा प्रकारे अंत झाल्यानं विरह सहन करून न शकणाऱ्या मातेचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

थोडक्यात बातम्या- 

“आमच्यासोबत यावं अन् मराठा आरक्षणाच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करावं”

खुशखबर! यंदा पाऊस वेळेवरच, 10 जूनपर्यंत पाऊस कोकणात धडकणार

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणातील ‘या’ आरोपीला जामीन मंजूर

अभिनेते दलिप ताहील यांचा मुलगा ड्रग्ज प्रकरणी अटकेत; अशी करत होता अंमली पदार्थांची मागणी

मास्क लाव सांगणं आलं अंगाशी, घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More