महाराष्ट्र मुंबई

खळबळजनक! मुंबईत 2 लेकींची हत्या करून वडिलांनी संपवलं आयुष्य

कांदिवली | मुंबईतल्या कांदिवली पश्चिम इथं एक आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कांदिवलीमध्ये एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली आहे.

घरातील तिघांनी ही आत्महत्या केली असून यामध्ये वडिल आणि दोन मुली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली  आहे.

घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाल्याचंही सांगण्यात येत आहे. यामध्ये कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या करत असल्याचं लिहिण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.

दरम्यान, वडिलांनी मुलींसह आत्महत्या केली की आधी मुलींची हत्या करून मग आत्महत्या केली याचाही पोलीस शोध घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

शीतल आमटेंच्या सासू-सासऱ्यांच्या आरोपांवर भावजय पल्लवी आमटे म्हणाल्या…

“जे खरं आहे ते आम्ही दाखवतोय, रुग्णसंख्येबाबत कुठलाही लपंडावाचा खेळ केलेला नाही”

चिंताजनक! कोरोना रूग्णांमध्ये आढळली 2 नवी लक्षणं

तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय- उद्धव ठाकरे

कोरोनावर मुख्यमंत्र्यांचा एवढा अभ्यास झाला की ते अर्धे डॉक्टर झालेत- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या