Top News

FAU-G गेमचा टीझर लाँच, नोव्हेंबरमध्ये येणार भारतीयांच्या भेटीला

नवी दिल्ली | ऑनलाईन गेमच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पबजीवर बंदी आणणल्यानंतर सरकारने फौजी (FAU-G) हा गेम आणणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता नोव्हेंबरमध्ये हा गेम भारतीयांच्या भेटीस येतोय.

पबजी या विदेशी गेमला पर्यायी गेम म्हणून फौजी हा मेड इन इंडिया सरकारने आणला आहे. अभिनेता अक्षय कुमारने या गेमचा टीझर लाँच केलाय. FAU-G गेम तयार करणाऱ्या एन कोअर गेम्स कंपनीने ट्वीट करत यासंदर्बात माहिती दिलीये.

FAU-G गेमच्या टीझरमध्ये युद्ध सुरु असल्याचं दिसतंय. भारतीय सैनिक इतर सैनिकांवर हल्ला करतायत शिवाय भारताचा झेंडा देखील डौलाने फडकताना या व्हिडीओमध्ये दिसतंय.

FAU-G हा गेम ‘भारत के वीर’ या ट्रस्टला पाठिंबा देणारा आहे. त्यामुळे यातून मिळालेला 20 टक्के नफा भारतीय आर्मीला देण्यात येणार आहे. हा गेम काही प्रमाणात पब्जीसारखाच असून फेयरलेस आणि यूनाइटिड गार्ड्स या नावाने ओळखलं जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

नितीश कुमार शारीरिक आणि मानसिकरित्या थकलेत; तेजस्वी यादव यांचा टोला

पंकजा मुंडे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम प्रभावी होईल; ‘या’ खासदाराने व्यक्त केली खदखद

‘…असं सरसंघचालक मोहन भागवत कधीच सांगणार नाहीत- शिवसेना

योग्य वेळ आली की शिवसैनिकच नारायण राणेंना उत्तर देतील- अशोक चव्हाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या