बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठेवीदारांना मोठा दिलासा; ‘एफडी’शी संबंधित विधेयक संसदेत मंजूर

नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. तर त्याआधीच्या वर्षात भारतातील अनेक व्यवसाय महागाईमुळे संकटात सापडले होते. त्यामुळे मागील तीन वर्षापासून या आर्थिक संकटामुळे देशातील काही बँका देखील मोठ्या अडचणीत सापडल्या होत्या. त्यामुळे सरकारला काही बँकांचं एकत्रीकरण देखील करावं लागलं होतं. त्यातच आता बँकेतील मुदत ठेवीदारांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

केंद्र सरकारने नुकतंच मुदत ठेवी म्हणजेच एफडीच्या संदर्भात एक दुरूस्ती विधेयक संसदेत सादर केलं आहे. डिपाॅझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरेंटी काॅर्पोरेशन दुरूस्ती विधेयक असं या विधेयकाचं नाव आहे. या विधेयक मंजूर झाल्यानं ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जर एखादी बॅक अडचणीत आली, तर मुदत ठेवीत असलेले 5 लाख रूपये आता खातेदाराला काढता येणार आहेत. याआधी मुदत ठेवी काढण्याची मर्यादा केवळ 1 लाख रूपये होती.

2019 मध्ये अनेक सहकारी बँका अडचणीत होत्या. त्यामुळे ठेवीदारांना अडचणीचा सामना करावा लागला होता. त्यावेळी सरकारने ठेवीदारांचा विमा हा 50 हजारांवरून लाखावर आणला होता. त्यानंतर आता हा विमा 5 लाखांवर आणल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत विधेयक सादर करताना सांगितलं आहे. संसदेच्या गोंधळाच्या परिस्थितीत हे विधेयक सादर करण्यात आल्यानं या विधेयकावर चर्चा झाली नाही.

दरम्यान, पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना या विधेयकाचा फायदा होणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर 23 सहकारी बँकेच्या खातेधारकांना याचा फायदा होणार आहे. तर छोट्या ग्राहकांना देखील याचा फायदा होईल, असंही सितारमण यांनी संसदेत सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राखी सावंतचा भालाफेकीचा कारनामा; व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

उर्वरित आयपीएल सामन्यांसाठी नवी नियमावली जाहीर; ‘या’ नियमात केले बदल

“पंकजा मुंडे माझ्या बहिण, त्यांनी अजून भावाला त्यांचं दु:ख सांगितलं नाही”

आता विदेशातील नागरिकही घेऊ शकतात भारतात लस, केंद्राचा महत्वपुर्ण निर्णय

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, तिकीट निश्चिती आरक्षणाचे नियम बदलले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More