बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् 15 कोरोना रूग्णांनी मिळेल त्या वाहनांनी घरी धूम ठोकली!

जळगाव | मागील काही महिन्यांपूर्वी कोरोना रूग्ण रूग्णालयातून पळाल्याचे अनेक प्रसंग समोर येत होते. परंतू सरकारने यावर कडक कारवाई करत अशा प्रकाराला आळा घातला होता. जळगावमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. कोविड सेंटरमधील रूग्णांनी पळ काढत मिळेल त्या वाहनांनी घरी धूम ठोकली आहे.

जळगावच्या जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे कोरोना संसर्ग वाढल्याने कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं आहे. धारीवाल पाॅलिटेक्नीक काॅलेजमध्ये हे सेंटर उभारण्यात आलं आहे. यातील 50 रूग्णांपैकी 15 रूग्णांनी आवश्यक सुविधा मिळत नसल्याचं कारण देऊन कोविड सेंटर मधून पळ काढला आहे.

चहा, नाष्टा, जेवण वेळेवर मिळत नाही. तर येथे मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा निकृष्ट आहे, असं या रूग्णांचं म्हणणं होतं. तर पिण्याच पाणी देखील वेळेवर मिळत नव्हतं, असा आरोप पळ काढणाऱ्या रूग्णांनी केला होता. झालेल्या प्रकाराची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. विनय सोनवणे यांनी दिली आहे.

दरम्यान, ठरलेल्या नियमाप्रमाणे सर्व गोळ्या औषधं चालू होती. तर योग्य वेळी नाष्टा आणि जेवण त्यांना दिलं जातं होतं, असं डाॅ विनय सोनवणे यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणात जामनेर पोलीस चौकीत तक्रार करण्यात आली आहे. तर रूग्णांना ताब्यात घेऊन कोविड सेंटरमध्ये सोडण्याची मागणी डाॅ.सोनवणे यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

चाहत्यानं दिलेलं गिफ्ट पाहून रितेश देशमुख झाला भावूक; पाहा व्हिडीओ

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यावर अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण!

पुण्यात क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाताना 18 वर्षीय तरुणी ग्रीलमध्ये अडकली अन्…, पाहा व्हिडीओ

“शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तात्काळ घरी पाठवावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More