बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आंदोलन भोवलं! काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर | काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमध्ये केंद्र सरकारविरूद्ध इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केलं होतं. यामुळे प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध सोलापूरमधील सदर बाजार पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना आंदोलन केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले हे देखील आंदोलनामध्ये सहभागी होते. यामुळे त्यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता सोलापूर पोलीस याप्रकरणी पुढे काय कारवाई करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सोलापूर महापालिकेवर गेल्या चार वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. परंतु गेल्या चार वर्षात फक्त अनागोंदी कारभार केला गेला. शहरात विकासाच्या नावाने मात्र बोंबाबोंब सुरु आहे, असा घणाघात प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस मेळाव्यात विरोधकांंवर केला होता.

दरम्यान, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आमदार प्रणिती शिंदे आपल्याबरोबर मंत्रीमंडळात नसल्याची खंत या मेळाव्यात व्यक्त केली होती. तसेच लवकरच प्रणिती शिंदे राज्य मंत्रीमंडळात राज्यमंत्री नव्हे तर कॅबिनेटमंत्री होतील, असं देखील विश्वजीत कदम यांनी यावेळी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या –

“आता जनतेच्या न्यायालयातच ‘या’ भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा होईल”

राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; ‘या’ 8 जिल्ह्यांना अलर्ट जारी

देसी जुगाड! बैल आणि ट्रॅक्टरशिवाय पठ्ठ्यानं नांगरलं शेत; पाहा व्हिडीओ

पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा भडकले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

“सब गोलमाल है! मी कट-कमिशन खाल्लं तर बुडबुड घागरी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More