बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर अभिनेत्री अंकिता लोखंडे अडकली लग्नबंधनात, पाहा व्हिडीओ

मुंबई | ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून प्रचंड गाजलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. अशातच अंकिता काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या कार्यक्रमांमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. 11 डिसेंबरच्या रात्री पासूनच अंकिता आणि विकीच्या विवाहसोहळ्याला सुरुवात झाली होती. अखेर अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) या जोडीनं लग्नगाठ (Marriage) बांधली आहे.

सोशल मीडियावर (Social Media) सध्या अंकिता-विकीच्या लग्नाचा बोलबाला पहायला मिळत आहे. नुकतंच या जोडीनं मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये लग्नगाठ बांधली. दोघांचाही सातफेरे घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

अंकिता-विकीच्या लग्नातील मेहेंदी, हळदी, एंगेजमेंटपासून भव्य कॉकटेल पार्टीपर्यंत सर्व कार्यक्रमांची सोशल मीडियावर चर्चा पहायला मिळाली. त्याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले.

दरम्यान, अंकिता-विकीच्या लग्नाआधीच्या विविध कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. यातच अंकिता-विकीच्या चाहत्यांची अखेर प्रतिक्षा संपली असून या गोड जोडीनं लग्नगाठ बांधली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

थोडक्यात बातम्या – 

रूपाली ठोंबरेंचा मनसेला दे धक्का; लवकरच ‘या’ नव्या पक्षात करणार प्रवेश

राज्यात Omicron चा धोका वाढला; ‘या’ ठिकाणी सापडले आणखी 8 रुग्ण

मोदींवर टीका करताना अमोल मिटकरींची जीभ घसरली, म्हणाले…

मृत स्वप्नील लोणकर मुलाखतीसाठी पात्र! वडिलांचा MPSC वर आरोप, म्हणाले…

अखेर शाळेची घंटा वाजणार! उद्यापासून राज्याच्या ‘या’ भागातील शाळा सुरू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More