बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर कोरोना लसीचा पहिला डोस घेतला- अमृता फडणवीस

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली असून आपला लस घेतानाचा फोटो शेअर केला आहे. सर, एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर येथे त्यांनी हा डोस घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना लस घ्यायची होती मात्र वय 45पूर्ण नसल्याने लस घेऊ शकत नव्हत्या. यामुळे त्या दु:खी असल्याचं अमृता फडणवीसांनी म्हटलं होतं. आपल्या वक्तव्यांमुळे, फोटोंमुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतं. आताही लस घेतानाचा फोटो शेअर केल्याने काही नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांनी लस घेतल्यानंतर अनेक युजर्स त्यांना ट्रोल करत आहेत. फोटो टाकण्याची गरज होती का? रश्मी वहिनींकडून काहीतरी शिका असं म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांचा पुतण्या तन्मय फडणवीस प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. दोन महिन्यांनी त्यांनी आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याची माहिती माहितीच्या अधिकारात समोर आलं आहे. त्याचं वय 45 च्या वर नसतानादेखील त्याला लस कशी काय मिळाली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

दरम्यान, या प्रकरणावरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पक्षातील नेत्यांनी टीका केली आहे.अमृता फडणवीस यांनी लस घेतलेल्या फोटोला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट आल्या आहेत.

 

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! दोन लहान मुलांसह सगळ्या कुटंबाला डंपरने चिरडलं, काळीज घट्ट करून पाहा व्हिडीओ

कोरोनाच्या या भारतीय लस कंपनीला मोठा झटका, लसीच्या आतप्कालीन वापरासाठी अमेरिकेचा नकार

अंधश्रद्धेचा कळस! ‘या’ कारणामुळे पाच वर्षाच्या मुलाला मातीत पुरलं अन्….

भारतीय संघात निवड होणारा पिंपरी-चिंचवडचा ‘हा’ पहिलाच क्रिकेटपटू

“शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला धमकी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More