Top News देश

पेट्रोल, डिझेल दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या…

Photo Credit- ANI

नवी दिल्ली | देशात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठी वाढ होत आहे. इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी सामान्यांकडून करण्यात येत आहे. देशात सलग नव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर विरोधक देखील आक्रमक झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीसाठी आधीचं सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

इंधन दरवाढ हा एक गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा असून ग्राहकांना योग्य स्तरावर इंधन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी एकत्र येत चर्चा केली पाहिजे. केंद्र आणि राज्यांनी दोन्ही पातळींवर ग्राहकांसाठी इंधन दरांच्या किमतीत आणण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, असं निर्मला सीतारामण यांनी म्हटलं आहे.

ओपीईसी देशांनी उत्पादनाचं जे अनुमान लावलं होतं तेदेखील खाली येण्याची शक्यता आहे. हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. इंधनाच्या किंमतींवर सरकारचं नियंत्रण नाही. ते तांत्रिकदृष्ट्या मुक्त करण्यात आले आहे. तेल कंपन्या कच्च तेल आयात करतात, रिफाइन करतात आणि विकतात, असंही सीतारामण म्हणाल्या.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे सामान्य जनतेच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलच्या भावाने शंभरी गाठली आहे. तर मुंबईत पेट्रोल 97 रुपये प्रतिलिटर आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, मंत्रिमंडळातील ‘या’ नेत्याने दिले संकेत!

परीक्षेला गेलेल्या मुलीचा प्रियकरासोबत सुरु होता भलताच अभ्यास, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

आता प्रादेशिक भाषेतही डोमेन नेम, भारतीय पठ्ठ्याने तयार केली पहिली वेबसाईट!

मशिदीत माईक बंद करायला विसरला मौलवी, ‘त्या’ आवाजानं गाव रात्रभर त्रस्त! पहा व्हिडीओ

धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीच्या पतीला पाठवला तिचा ‘तो’ व्हिडीओ त्यानंतर…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या