मुंबई | कंगणा राणावतने अखेर Koo या इंडियन मायक्रो ब्लॉगिंग अॅपवर एन्ट्री घेतली आहे. या संदर्भात कंगणाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली आहे.
कू-अॅपवर एंट्री करताच कंगणाच्या फाॅलअर्समध्ये खूप वाढ झाली असून केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी सुद्धा कंगणा राणावतला फाॅलो करत आहे.
कू अॅपवरील आपल्या बायोमध्ये कंगणाने स्वत:ला खरी देशभक्त आणि गरम रक्ताची क्षत्रिय स्त्री म्हटलं आहे. या अॅपवरील आपल्या पहिल्या पोस्टमध्ये कंगणाने ट्विटरला भाड्याचं घर म्हटलं आहे.
सर्वांना हॅलो, रात्री काम करतेय आणि सध्या धाकड क्रूचा लंच ब्रेक आहे. तेव्हा कू का करू नये? ही माझ्यासाठी नवी जागा आहे, त्यामुळे समजण्यास थोडा वेळ लागले. पण भाड्याचे घर शेवटी भाड्याचे असते आणि आपलं घर आपलंच असतं…, असं कंगणाने लिहिलं आहे.
थोडक्यात बातम्या-
गुंडांना टोलमाफी, फटाके वाजवून जल्लोष… गृहराज्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये!
पूजा चव्हाण प्रकरणात ऑडिओ क्लीप कशा लीक झाल्या?; समोर आली धक्कादायक माहिती
सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची भेट; चर्चांना उधाण
सर्वात आधी पुणेकरांना कोरोनाची लस द्या; थेट पंतप्रधान मोदींकडे मागणी
भाजप श्रीलंकेत सत्तास्थापन करणार; श्रीलंकेने दिलं ‘हे’ प्रत्युत्तर