पुणे | पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिका प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत तसेच शहरात उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांविषयीची माहिती देण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आकडेवारी जाहीर केली आहे.
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 फेब्रुवारीला पुण्यामध्ये दुसरी लाट आली आणि 50 दिवसात 1 हजार 250 असलेली रुग्णसंख्या ही थेट 46 हजारांच्या घरात जाऊन पोहोचली. तसेच पुण्यामध्ये सध्या पॉझिटिव्ह रेट हा जवळपास 28 टक्के असून तो कमी करण्याचा प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येत असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं.
21 मार्च रोजी पुण्यामध्ये 3500 बेड्स, 900 व्हेंटिलेटर आणि 2000 ऑक्सिजन बेड होते. त्यानंतर 15 दिवसांमध्ये या आकडेवारीत दुप्पट वाढ करण्यात आली असून पुण्यामध्ये ESI हॉस्पिटल ताब्यात घेऊन तिथे 90 बेड तयार करण्यात येणार आहेत. तसेच सैन्यदलाचे 20 व्हेंटिलेटर आणि 19 ऑक्सिजन बेड पुणे महापालिकेला मिळाले आहेत आणि काही दिवसांनी अजून एवढाच पुरवठा होणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. तसेच व्हेंटिलेटर बेड वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. आता सध्या 400 ऑक्सिजन बेड शिल्लक असून 6 खासगी रुग्णालयं 100 टक्के कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असंही आयुक्तांनी यावेळी सांगितलं आहे.
पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात सहा लाख लसीकरणाचे डोस मिळाले होते. शहरातील एकूण 125 ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आली असून दररोज जवळपास 22 हजारांपेक्षाही जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात येत आहे. त्याबरोबरच आता पुण्यात फक्त 25000 लसींचा साठा शिल्लक असल्याचं आयुक्तांनी सांगितलं आहे. तसेच मास्क न वापरलेल्या पुणेकरांकडून आतापर्यंत 15 कोटी 77 लाख रुपये दंड गोळा केल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
थोडक्यात बातम्या –
एड्स मुक्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल, समोर आली आनंदाची बातमी!
“फडणवीसांनी कोणत्या जिल्ह्यात लसींचा साठा सर्वाधिक आहे ते दाखवून द्यावं”; जयंत पाटलांचा पलटवार
पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार; नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा
“जाणीवपूर्वक लसीकरण बंद करून, लसींच्या बाबतीत चुकीच्या बातम्या पसरविण्याचं कारण काय?”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.