‘फेरीवाला आंदोलन’ प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा

पुणे | फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यात फेरीवाल्यांविरोधात मनसेनं तोडफोड केली होती. त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केलाय.

पुण्यात फेरीवाल्यांविरोधात मनसेनं राजारामपुलाजवळ आंदोलन केलं होतं. सिंहगड पोलिस ठाण्यात आंदोलन केलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

फर्ग्युसन महाविद्यालय रोडवरील हल्ल्याप्रकरणीही मनसे अधिकाऱ्यांवर डेक्कन पोलिस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईमध्ये फेरीवाल्यांविरोधात मनसेनं आंदोलन केलं होतं, त्यापाठोपाठ पुण्यातही आंदोलन छेडलं होतं.