बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊन रद्दच्या निर्णयाचा जल्लोष आला अंगलट; इम्तियाज जलील यांच्यावर झाली ‘ही’ कारवाई

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 31 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत कडक लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर औरंगाबादचे एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांंनी या लाॅकडाऊनला कडाडुन विरोध केला आणि या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला.

औरंगाबाद जिल्ह्यातील लाॅकडाऊनचा निर्णय मागे घेण्याचे आदेश राज्य सरकारने काल दिले त्यानंतर, तो निर्णय मागे घेत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. या सर्व घटनेनंतर इम्तियाज जलील यांनी या निर्णयाच्या स्वागतार्ह कार्यकर्त्यांसह जल्लोष केला. विशेष म्हणजे या दरम्यान खासदार साहेबांसह सर्वांनाच कोरोनाचा विसर पडल्याचं दिसुन आलं.

आता जलील यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर जमावबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादमधील लॉकडाऊनचा निर्णय रद्द होताच इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती. जलील यांच्यासह 11 जणांवर औरंगाबाद पोलिसांनी जमावबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

औरंगाबाद शहरात कोरोना पसरवण्याला ‘एमआयएम’ खासदार इम्तियाज जलील जबाबदार आहेत. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करुन काल इम्तियाज जलील यांनी जल्लोष साजरा केला होता. अशा शब्दात शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आगपाखड केली. त्यानंतर खैरेंनी जलील यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यानंतर, ‘चंद्रकांत खैरे यांना कायद्याचं ज्ञान नाही’, असा टोमणा जलील यांनी खैरेंना लगावला होता.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रात 2 एप्रिलपासुन मर्यादित लाॅकडाऊन?; वाचा कसं असु शकतं स्वरूप

“हो, मी भाजप नेत्याला फोन केला होता पण…”- ममता बॅनर्जी

भारताच्या माजी पंतप्रधानांना कोरोनाची लागण; मोदींनी फोनवरून दिला ‘हा’ सल्ला

अॅम्बुलन्सचं स्पीड इतकं की, व्हिडीओ पाहून लोकंही झाले चकीत, पाहा व्हिडीओ

इम्तियाज जलील यांचा जल्लोष पाहिल्यानंतर, अमेय खोपकर म्हणतात…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More