मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

गोरेगावमधील फिल्म स्टुडिओला भीषण आग!

मुंबई | गोरेगाव पश्चिममधील बांगुल नगर येथील मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या एका फिल्म स्टुडिओला भीषण आग लागली आहे.

स्टुडिओला आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.

तब्बल 8 ते 10 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या स्टुडिओत खुर्च्या आणि इतर फर्निचर होतं. त्यामुळे आगीने लाकडी सामानाला तात्काळ पेट घेतला.

सोसायट्याचा वारा सुटल्याने ही आग अधिकच भडकली. बघता बघता आगीने उग्ररुप धारण केलं.  अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तासाभराने ही आग नियंत्रणात आणली.

थोडक्यात बातम्या-

“हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का?, सरकारला लाज वाटायला हवी”

काँग्रेसने शेतकऱ्याला पिंजऱ्यात पोपट बनवुन ठेवलं होतं, पण…- सदाभाऊ खोत

धक्कादायक! पोलिओ डोसऐवजी पाजलं सॅनिटायझर, 12 बालके रुग्णालयात

“आम्ही निवडणुकीचा फारसा विचार करत नाही, सरकारने जी वचनं दिली पुर्ण करून दाखवणारच”

अर्थसंकल्पानंतर बाबा रामदेव यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या