बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

नवी दिल्ली | दिल्लीत असलेल्या महाराष्ट्र सदनाला आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज सकाळी ही आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी गेल्या होत्या. त्यानंतर आता आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे.

महाराष्ट्र सदनात लागलेल्या आगीत कोणतीही जिवीत हानी नसल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सदनात राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षेत ही आग लागली होती. राज्यपालांच्या कक्षेत शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सर्वत्र धुराचं साम्राज्य तयार झालं होतं.

आगीच्या घटनेमागील कारणांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. सदनात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. तर दिल्ली पोलिसाचं एक पथक देखील घटनास्थळी पोहोचलं आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सदनात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्री देखील येत असतात. महाराष्ट्र सदन हे महत्वाचं ठिकाण आहे. आग लागल्यानंतर दिल्ली पोलिसांसह सर्व अधिकारी देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

पूरग्रस्तांसाठी विजय वडेट्टीवार यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

सांगलीत कृष्णेचा रूद्रावतार ; 1 लाख 96 हजार 957 नागरिकांचं स्थलांतर

काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचं निधन!

PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे येणार

भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकन फलंदाज फेल; टी-20 सामन्यात भारताचा दमदार विजय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More