बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इराकमध्ये अग्नितांडव! ऑक्सीजन सिलेंडर स्फोटात 82 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली  | जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. त्यातच इराकमध्ये अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. इराकची राजधानी असलेल्या बगदाद शहरात एका रुग्णालयातील ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरीकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ऑक्सीजन सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत आतापर्यंत तब्बल 82 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, त्याबरोबरच 100 पेक्षाही जास्त रुग्ण या आगीत जखमी झाले आहेत. एकीकडे कोरोनाचं संकट आणि दुसरीकडे अशी दुर्दैवी घटना यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बगदादच्या अल खतीब रुग्णालयात आयसीयूमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होता. त्यावेळी अचानक ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट झाला आणि आयसीयु मधून या आगीने रौद्ररूप प्राप्त केले. आगीमुळे ज्यांना चालता येत होतं, ते चालून बाहेर पडू शकले. पण जे रुग्ण गंभीर होते ज्यांना चालता येत नव्हतं अशांचा मात्र दुर्दैवी अंत झाला.

इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि सखोल चौकशी केली जाईल, तसेच दोषी असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असं सांगितलं. सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये काही लोक जीव वाचवण्यासाठी रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारत असल्याचे पाहायला मिळत आहे .

थोडक्यात बातम्या 

जोतिबा यात्रेवर कोरोनाचं सावट; यात्रेतील मानकरीच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने यात्रा रद्द

दिलासादायक! मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आजची आकडेवारी

सचिन वाझेचा धनी अनिल देशमुख मग देशमुखांचा धनी कोण?- गोपीचंद पडळकर

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

प्रसिद्ध राजन-साजन जोडीतील पद्मभूषण राजन मिश्रा यांचं कोरोनानं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More