बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IPL 2021 : MI vs RCB, ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

चेन्नई | आज इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 14 वा हंगाम सुरू होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मानसिकदृष्ट्या खच्चीकरणं झालेल्या क्रिकेटप्रेमीचे मनोरंजन करायला आयपीएल सज्ज झाली आहे. गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामी लढत रंगणार आहे.

चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ पहिला सामना जिंकून विजयी सलामी देण्यास तयार आहे. तर दुसरीकडे विराट कोहली देखील चेपाॅकवर आपल्या खराब कामगिरीचा इतिहास पुसण्यासाठी तयार असेल. या सामन्यात दोन्ही संघातील काही विशेष खेळाडूवर नजर असणार आहे.

मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा याच्या फलंदाजीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर मुंबईची मिडल ऑर्डर समजल्या जाणाऱ्या इशान किशन आणि सुर्यकुमार यादव या दोन तगड्या खेळाडूंच्या कामगिरीवर क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. तर मुंबईला लाभलेल्या जागतिक दर्जाच्या बोल्ट-बुमराह जोडीची चर्चा देखील रंगली आहे.

बंगळुरूकडून कर्णधार कोहली, ए बी डिव्हिलीयर्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी असेल. तर कोहली यावेळी सलामीचा फलंदाज म्हणून खेळायला येईल, अशी देखील चर्चा रंगली आहे. तर बंगळुरूचे फिरकीपटू चहल आणि सुंदरची जोडी मुंबईसाठी किती घातक यावर या सामन्याचा निकाल ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन; केली ‘ही’ मागणी

पुण्यात आरोग्य आणीबाणी; ‘या’ तीन गोष्टींची मोठी कमतरता!

नगरच्या तरुणाची औरंगाबादमध्ये निर्घृण हत्या, हाताविना आढळला मृतदेह

लस संपली! मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र पुरवठ्याअभावी बंद

‘त्या’ प्रकरणात माझीही चौकशी करा; अजित पवारांचं खुलं आव्हान

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More